सलग दुसऱ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर मात, तिसऱ्या वनडेची औपचारिकता

सलग दुसऱ्या सामन्यात भारताची झिम्बाब्वेवर मात, तिसऱ्या वनडेची औपचारिकता

हरारे : झिम्बाब्वे विरुद्धच्या सलग दोन विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी 162 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. भारताने हे आवाहन पाच गडी गमावून 26व्या षटकात पार केले.

भारताने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीसाठी झिम्बाब्वेला पाचारण केले. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे झिम्बाब्वेचे फलंदाज ढेपाळले. अवघ्या 38.1 षटकांत 161 धावांवर झिम्बाब्वेचा संघ तंबूत परतला. कैटानो व इनोसेंट काइया ही जोडी सलामीला आली आणि त्यांनी 8.4 षटकांत 20 धावा केल्या. मोहम्मद सिराजने कैटानोला सात धावांवर बाद करून पहिला धक्का दिला.

त्यानंतर बाराव्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर शार्दूलने विकेट घेतली. सिकंदर रजा व सीन विलियम्स या जोडीने 50 चेंडूत 41 धावा केल्या. विलियम्सन 42 चेंडूंत 3 चौकार व एक षटकारांसह 42 धावांवर माघारी परतला. तर, रायन बर्ल 41 धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या फलंदाजीमुळे झिम्बाब्वेचा डाव सावरला. त्यांना कोणाकडूनही अपेक्षित साथ मिळाली नाही. भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी मिळवले. शार्दुललाल अन्य गोलंदाजांची साथ चांगलीच मिळाली.

भारतीय संघातर्फे शिखर धवनबरोबर लोकेश सलामीला आला. पण कर्णधाराची ही चाल फसली. फक्त एक धाव करून तो तंबूत परतला. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर फलंदजीला आलेल्या शुबमन गिलला आज सूर गवसला नाही. गिल आणि धवन प्रत्येकी 33 धावांवर बाद झाले. संजू सॅमसनने मात्र नंतर बाजू सावरली. त्याने एक बाजू लावून धरली. त्याला साथ मिळाली ती दीपक हुडाची. दीपक हुडाने 25 धावा केल्या. दीपक बाद झाल्यावर संजूने खेळाची सूत्रे हाती घेतली आणि भारताला विजय मिळवून दिला.

First Published on: August 20, 2022 7:35 PM
Exit mobile version