T20 World Cup 2024 : नऊ खेळाडूंची नावं शर्यतीत; भारतीय संघ या तारखेला अमेरिकेला होणार रवाना

T20 World Cup 2024 : नऊ खेळाडूंची नावं शर्यतीत; भारतीय संघ या तारखेला अमेरिकेला होणार रवाना

T20 World Cup 2024, मुंबई : अमेरिका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली 1 ते 29 जून या कालावधीत टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ 21 मे रोजी अमेरिकेत रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघातील खेळाडू जरी 21 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार असले तरी, अद्याप संघ जाहीर झालेला नाही. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप 2024 साठीच्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Indian Cricket Team T20 World Cup 2024 may go usa on 21st may for t20 world cup 2024 in between ipl)

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगनंतर आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी आज (29 एप्रिल) संघ जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. मात्र, अंतिम सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीच भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत रवाना होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ 21 मे रोजी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. आयपीएलमधील प्लेऑफमध्ये न पोहचणाऱ्या संघातील खेळाडू 21 मे रोजी अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. पहिल्या बॅचमध्ये टीम इंडियाचे कोण कोणते खेळाडू रवाना होतील, हे आयपीएलमधील संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

हेही वाचा – Cricket News: ‘तुम्ही रातोरात रोहित शर्मा बनू शकत नाही…’ पाकिस्तानी दिग्गजाने बाबर आझमच्या संघाला सुनावलं

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे 1 जूनपासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. तसेच, 1 मे रोजी वर्ल्ड कपसाठी संघाची निवड करण्यासाठी आयसीसीनं सर्वांना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाची निवड झाल्यास कोणाला संधी मिळणार हे, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे टी-20 वर्ल्ड कपसाठी रनमशीन विराट कोहलीला संघात स्थान देऊ नका, अशी मागणी अनेक क्रीडा चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी केली आहे. दिग्गज क्रिकेटर्स आणि एक्सपर्ट्स यांनी आपल्या संघात विराट कोहलीला स्थान दिले नाही. त्यामुळे टीम इंडियात विराट कोहलीला स्थान मिळतेय? याकडेही लक्ष लागलेय.

या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडकर्ते 15 सदस्यीय संघाची घोषणा करतील. यापैकी 9 नावे अशी आहेत, ज्यांची निवड निश्चित मानली जात आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतचे यष्टिरक्षक म्हणून पुनरागमन होणार आहे. गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळणार हेही निश्चित मानले जात आहे.


हेही वाचा – IPL 2024: हैदराबादला हरवून चेन्नईची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप; ऑरेंज कॅपच्याजवळ गायकवाड

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 29, 2024 4:44 PM
Exit mobile version