पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम

पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम

भारताचा डावखूरा क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निववृत्ती जाहीर केली आहे. पार्थिव पटेलने ट्विट करत माहिती दिली. वयाच्या ३५ व्या वर्षी पार्थिवने निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. पदार्पण केले तेव्हा तो १७ वर्ष आणि १५३ दिवसांचा होता.

३५ वर्षीय पटेलने आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत २५ कसोटी सामने, ३८ एकदिवसीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. घरगुती क्रिकेटमध्ये त्याने गुजरातकडून १९४ सामने खेळले. जानेवारी २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या भारताच्या ऐतिहासिक कसोटी संघातही तो सहभागी होता. एक वर्षानंतर, ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकणार्‍या भारतीय संघातही पटेलचा समावेश होता. २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंघहॅममध्ये पटेलने भारताकडून पदार्पण केले होते. भारताकडून कसोटी खेळणारा तो सर्वात युवा विकेटकीपर होता. २००४ मध्ये दिनेश कार्तिक आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या संघआतील एंट्रीनंतर पटेल हा टीमचा नियमित सदस्य म्हणून राहू शकला नाही.

पार्थिवने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३१.१३च्या सरासरीने ९३४ धावा केल्या. यात ६ अर्धशतकाचा समावेश आहे. ७१ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याने ६२ कॅच आणि १० स्टपिंग केले. ३८ वनडेत त्याने २३.७४च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. ९५ ही त्याची वनडेतील सर्वेत्तम खेळी आहे. पार्थिवने वनडेत ३० कॅच तर ९ स्टपिंग केले आहेत. प्रथम श्रेणीत त्याने १८७ सामन्यात ४३.३६च्या सरासरीने १० हजार ७९७ धावा केल्या. २०६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणीत त्याने २६ शतक आणि ५९ अर्धशतक केली आहेत. तर ४६६ कॅच आणि ७६ स्टपिंग केलेत.

 

First Published on: December 9, 2020 1:00 PM
Exit mobile version