ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज

टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला दणका दिल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. ही मालिका विश्वचषकाच्या दृष्टीने कर्णधार रोहित शर्मासाठी आणि भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. भारताला मायदेशात आतापर्यंत दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध एकही टी-20 मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही मालिका आता भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मालिकेला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

2015 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तीन मालिकांच्या सामन्यात भारताचा 2-0 असा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये खेळण्यात आलेली टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरी केली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका –

28 सप्टेंबर – पहिला T20,त्रिवेंद्रम

1 ऑक्टोबर – दुसरा T20,गुवाहाटी

3 ऑक्टोबर – तिसरी T20,इंदूर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका –

पहिली वनडे – 6 ऑक्टोबर, रांची

दुसरी वनडे – 9 ऑक्टोबर, लखनौ

तिसरी एकदिवसीय – 11 ऑक्टोबर, दिल्ली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.


हेही वाचा : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया खेळणार भारत-दक्षिण आफ्रिका सामने, जाणून घ्या वेळापत्रक


 

First Published on: September 27, 2022 3:38 PM
Exit mobile version