Asia Under 19 world Cup 2021 : आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; जुन्नरच्या सुपूत्रालाही मिळाली संधी

Asia Under 19 world Cup 2021 : आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; जुन्नरच्या सुपूत्रालाही मिळाली संधी

भारताच्या १९ वर्षाखालील (under-19) संघाच्या आगामी काळात मोठ्या स्पर्धा होणार आहेत. दरम्यान यातीलच एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे १९ वर्षाखालील आशियाई चषक. आता या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) ज्युनियर क्रिकेट निवड समितीतर्फे भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या संघात महाराष्ट्रातील जुन्नरचा सुपूत्र कौशल तांबेला संघात स्थान मिळाले आहे. या स्पर्धेला २०२१ वर्षाच्या अखेरीस म्हणजेच २३ डिसेंबरपासून यूएईत सुरूवात होणार आहे. भारतीय संघातील २० खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये राखीव ५ खेळाडूंचा समावेश केला आहे. असा एकूण २५ खेळाडूंचा संघ स्पर्धेपूर्वी बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीच्या सराव शिबिरात सहभागी होईल. ११ ते १९ डिसेंबरदरम्यान हे सराव शिबिर पार पडणार आहे.

दरम्यान, २०२१ च्या आशियाई चषकासाठी १९ वर्षाखालील संघाचे कर्णधारपद यश धुळ याच्याकडे असणार आहे. तर वसू वत्स याचाही २० खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत अद्याप संभ्रम आहे. तो फिट झाला तरच तो स्पर्धेसाठी जाऊ शकणार आहे. तसेच महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेचाही २० खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. कौशलला यापूर्वी बांगलादेशविरूध्द झालेल्या तिरंगी मालिकेत १९ वर्षांखालील भारत ब च्या संघात स्थान मिळाले होते.

२०२२ च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारतीय संघाला वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. त्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे.

आशियाई चषकासाठी १९ वर्षाखालील भारतीय संघ

हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुळ (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना, आराध्य यादव, राजनगड बावा, राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवन, रवी कुमार, रिषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स,

राखीव खेळाडू

आयुष सिंग ठाकूर, उदय सहारन, शाश्वत डंगवाल, धनुष गौडा, पीएम सिंह राठोड,


हे ही वाचा: http://Ashes Series 2021 : ॲशेससाठी स्टोक्स तयार नाही; ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने साधला निशाणा


 

First Published on: December 10, 2021 3:52 PM
Exit mobile version