भारतीय महिलांना सातव्यांदा आशिया चषकाचा मान, स्मृती मानधनाचं अर्धशतक

भारतीय महिलांना सातव्यांदा आशिया चषकाचा मान, स्मृती मानधनाचं अर्धशतक

महिला आशिया चषक २०२२ मधील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत आठ विकेट्सनं धुव्वा उडवला आहे. या विजयासह भारतानं सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरलं आहे. उपांत्य फेरीत पाकिस्तानवर भारतीय संघाने रोमहर्षक विजय मिळवला होता. त्यानंतर भारतानं अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु अंतिम फेरीत भारतानं श्रीलंकेवर मात केली.

श्रीलंकेनं 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून भारतासमोर 66 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 8.3 षटकातच जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 11 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला.

महिला आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर भारताने एकूण 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. यामध्ये 4 एकदिवसीय तर 3 टी-20 विजेतेपदांचा समावेश आहे. या संघाने 2004 मध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. 2008 च्या फायनलमध्ये कर्णधार म्हणून मिताली राजने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली होती.


हेही वाचा : T20 विश्वचषकात सूर्या एक्स-फॅक्टर बनेल; रोहित शर्माकडून सूर्यकुमार यादवचे


 

First Published on: October 15, 2022 4:47 PM
Exit mobile version