Asian games 2018: भारताच्या अरपिंदर सिंहची तिहेरी उडीत सुवर्णकामगिरी

Asian games 2018: भारताच्या अरपिंदर सिंहची तिहेरी उडीत सुवर्णकामगिरी

अरपिंदर सिंहने जिंकले सुवर्ण पदक

जकार्तात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ११ व्या दिवशी भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताच्या २५ वर्षीय अरपिंदर सिंहने तिहेरी उडीत सुवर्ण कामगिरी केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदर सिंहने अंतिम सामन्यामध्ये १६.७७ मीटर उडी घेत सुवर्णपदक पटकावले आहे.

असा झाला सामना

जकार्तात आज झालेल्या अंतिम सामन्याची सुरुवात अरमिंदर सिंग चांगल्या प्रकारे करु शकला नाही. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६.५८ मीटरपर्यंत उडी मारली आणि तिसऱ्या प्रयत्नात अरपिंदर सिंहने उत्कृष्ट कामगिरी करत १६.७७ मीटर उडी मारत सुवर्ण पदक स्वत:च्या नावावकर केले. अरपिंदर सिंहच्या या सुवर्ण कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. अनेक दिग्गजांनी ट्विट करुन अरपिंदरला शुभेच्छा दिल्या. अमरितसरमध्ये अरपिंदर सिंहच्या कुटुंबियांनी देखील त्याने केलेल्या सुवर्णकामगिरीनंतर फटाके वाजूवून मिठाई वाटत आनंद साजरा केला.

अरपिंदरची सुवर्ण कामगिरी

अरपिंदर सिंहने १६.७७ मीटर उडी मारत सुवर्ण पदक पटकावत पहिले स्थान मिळवले तर उजबेकिस्तानच्या कुर्बानोव रुसलान याने १६.६२ मीटर उडी मारत रौप्य पदक पटकावत दुसरे स्थान मिळवले. तर तिसऱ्या स्थानावर चीनच्या चाओ शू राहिला आहे. त्याने १६.५६ मीटर उडी मारत कांस्य पदक पटकावले आहे.

आतापर्यंत भाराताने ५३ पदक जिंकले

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत १० सुवर्णपदक, २० रौप्य पदक आणि २३ कांस्य पदक मिळाले आहेत. या स्पर्देत ५३ पदक जिंकत भारत नवव्या क्रमांकावर आहे.

First Published on: August 29, 2018 9:10 PM
Exit mobile version