India Squad T20 World Cup 2024 : संघातील शिवम दुबेच्या निवडीवर रोहित शर्माचे स्पष्टीकरण; म्हणाला…

India Squad T20 World Cup 2024 : संघातील शिवम दुबेच्या निवडीवर रोहित शर्माचे स्पष्टीकरण; म्हणाला…

मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. तसेच, शिवम दुबेसह ऋषभ पंतची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर आज (2 मे) निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय संघाबाबत माहिती देताना मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज शिवम दुबे यांच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (India T20 World Cup 2024 Squad Press Conference Rohit Talk On Shivam Dube Selection In Team)

भारतीय संघातील शिवम दुबे याच्या निवडीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही संघ निवडताना मधल्या फळीतील चांगल्या हिटरला महत्त्व दिले. असे खेळाडू टॉप ऑर्डरला अधिक मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतात. त्यामुळे आम्ही शिवम दुबे सारख्या व्यक्तीची निवड केली, जो आमच्यासाठी हे काम करू शकतो. आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि त्याआधी त्याने राष्ट्रीय संघासाठी केलेली कामगिरी लक्षात ठेवूनच शिवमची निवड केली गेली आहे. पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेलच अशी हमी नाही. प्लेइंग इलेव्हन अजून आम्हाला माहित नाही आम्ही तिथे गेल्यावरच ठरवू शकतो”, असे रोहित शर्माने सांगितले.

भारतीय संघाचे वेळापत्रक

भारताचा टी-20 वर्ल्ड कप संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

राखीव खेळाडू – शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद.


हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारताला यंदाही ट्रॉफी नाही, हे 4 संघ उपांत्य फेरीत जाणार; मायकल वॉनचं भाकीत

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 2, 2024 7:28 PM
Exit mobile version