थकलेला धोनी चक्क एअरपोर्टच्या जमिनीवर झोपला; फोटो होतोय व्हायरल

थकलेला धोनी चक्क एअरपोर्टच्या जमिनीवर झोपला; फोटो होतोय व्हायरल

धोनी चक्क एअरपोर्टच्या जमिनीवर झोपला.

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. धोनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांनी या फोटोला खूप लाईक्स आणि कमेंट्स दिलाय आहेत. त्यामागचे कारण देखील तसे आहे कारण या फोटोमध्ये धोनी आणि त्याची पत्नी साक्षी जमिनीवर झोपल्याचे दिसत आहे. आयपीएल मॅचचे शेड्यूल खूप व्यस्त असल्यामुळे खेळाडूंना आराम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. अशामध्ये थकलेला धोनी एअरपोर्टच्या जमिनीवर झोपला. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

चक्क धोनी जमिनीवर झोपला

आयपीएल २०१९ मध्ये मंगळवारी झालेल्या २३ व्या सामन्यामध्ये एम एस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने थोडा वेळ आराम केल्यानंतर ते चेन्नई एअरपोर्टवर पोहचले. चेन्नईवरुन या टीमला राजस्थानच्या जयपूर येथे पुढचा सामना खेळण्यासाठी जायचे होते. मात्र, त्यांची फ्लाईट सकाळची होती आणि सर्व खेळाडू लवकर एअरपोर्टवर पोहचले होते. अशामध्ये थकलेल्या महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने एअरपोर्टच्या जमिनीवर झोपणे पसंद केले.

‘शांत रहा देव आराम करत आहे’

महेंद्र सिंह धोनी याने स्वत: त्याच्या इस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याने असे म्हटले आहे की, “आयपीएल टायमिंगच्या आधी झाल्यानंतर जर सकाळची फ्लाईट असेल तर असेच होणार” महेंद्र सिंह धोनी याच्या या फोटोला त्याच्या फॅन्सने हजारो कमेंट्स केल्या आहेत. काही फॅन्सनी या फोटाला पाहून जमिनीशी जोडलेला माणूस असे म्हटले आहे. तर धोनीच्या दुसऱ्या फॅनने असे सुध्दा म्हटले आहे की, ‘शांत रहा देव आराम करत आहे.’ दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स पॉईटटेबलवर पहिल्या क्रमांकावर आहे.

धोनीच्या फोटोला फॅन्सनी दिल्या खूप लाइक्स

धोनीच्या इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटो त्याच्या फॅन्सला खूप आवडला. तसे पहायला गेले धोनी सोशल मीडियावर खूप कमी एक्टिव असतो. याआधी त्याने २४ मार्चला इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये तो जीवा म्हणजे त्याच्या मुलासोबत मस्ती करत होता. १७ दिवसानंतर त्याने आज हा फोटो शेअर केला. या फोटोला देखील त्याच्या फॅन्सने खूप लाईक्स दिले.

First Published on: April 10, 2019 5:30 PM
Exit mobile version