बंगळुरुचा सलग पाचवा पराभव; कोलकाताने ५ गडी राखत केली मात

बंगळुरुचा सलग पाचवा पराभव; कोलकाताने ५ गडी राखत केली मात
आंद्रे रसलच्या जलद फटकेबाजीमुळे आज बंगळुरूचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे. बंगळुरुचा आयपीएलच्या १२ व्या मोसमात हा सलग पाचव्यांदा पराभव आहे. कोलकाताने ५ गडी राखत बंगळुरुचा पराभव केला आहे. हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानावर होता. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरूने २०४ धावा केल्या. परंतु, कोलकाताने पाच गडी राखत बंगळुरुचा पराभव केला.   .

कोलकाताला पहिला धक्का; सुनील नारायण बाद

मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सुनील झेलबाद झाला.

A view of the sea
Chetan Patil

कोलकातापुढे २०६ धावांचे आव्हान

बंगळुरुला तिसरा झटका; ए.बी. डिव्हिलियर्स बाद

बंगळुरुचा आक्रमक फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्स बाद झाला आहे. डिव्हिलियर्सने ३२ चेंढूत ६३ धावा केल्या.

बंगळुरुला मोठा झटका; विराट कोहली बाद

बंगळुरुला मोठा झटका लागला आहे. कर्णधार विराट कोहली झेलबाद झाला आहे. त्याने ४९ चेंडूत ८४ धावा केल्या.

Chetan Patil

बंगळुरुची दणकेबाज सुरुवात; १२ षटकांत १०० धावा

First Published on: April 5, 2019 8:51 PM
Exit mobile version