IPL 2021 : पृथ्वी शॉने कामगिरीत सुधारणा केल्याचा आनंद – लक्ष्मण  

IPL 2021 : पृथ्वी शॉने कामगिरीत सुधारणा केल्याचा आनंद – लक्ष्मण  

पृथ्वी शॉ

दिल्ली कॅपिटल्सचा युवा भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉने यंदाच्या आयपीएल मोसमाची दमदार सुरुवात केली. पृथ्वीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ३८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. पृथ्वीला मागील मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. यंदाच्या मोसमाची मात्र त्याने दमदार सुरुवात केली याचा भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणला आनंद आहे. तसेच लक्ष्मण सनरायजर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक असून या संघाला कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. आम्ही हा सामना केवळ १० धावांनी गमावला असला तरी कोलकाताने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केल्याचे लक्ष्मणने नमूद केले.

अजून खूप क्रिकेट खेळायचेय 

नैसर्गिक खेळ केल्याचा आनंद आहे. त्याने किती धावा केल्या, त्यापेक्षा त्याने या धावा ज्याप्रकारे केल्या ते मला खूप आवडले. त्याला यंदाच्या आयपीएलचा दुसरा सामना चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झाला. या सामन्यात पृथ्वी शॉने आपला मागील काही काळात चांगली कामगिरी करता न आल्याने त्याने भारतीय संघातील त्याचे स्थान गमावले आहे. याचे त्याला दुःख नक्कीच असेल. मात्र, त्याने त्याच्या कामगिरीत सुधारणा केल्याचा आनंद आहे. तो युवा खेळाडू असून त्याला अजून खूप क्रिकेट खेळायचे आहे, असे लक्ष्मण म्हणाला.

First Published on: April 13, 2021 10:44 PM
Exit mobile version