IPL 2021 : राजस्थानची प्रथम गोलंदाजी; ऋतुराज गायकवाड CSK संघात कायम  

IPL 2021 : राजस्थानची प्रथम गोलंदाजी; ऋतुराज गायकवाड CSK संघात कायम  

महेंद्रसिंग धोनी आणि संजू सॅमसन

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले. त्यामुळे त्यांनी बदल करणे टाळले आहे. चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. त्यांनी संघात बदल करणे टाळले असून सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पुन्हा संधी दिली आहे. ऋतुराजला पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ १० धावा करता आल्या आहेत. मात्र, वानखेडेवर सुरुवातीला फलंदाजी करणे अवघड असते. त्यामुळे सलामीवीर लवकर बाद होऊ शकतात, असे म्हणत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजवर विश्वास दाखवला.

First Published on: April 19, 2021 7:17 PM
Exit mobile version