IPL 2022 Auction : कोहली, धोनीपासून रोहित पर्यंत…; या खेळाडूंची रिटेनसाठी नावं झाली पक्की

IPL 2022 Auction : कोहली, धोनीपासून रोहित पर्यंत…; या खेळाडूंची रिटेनसाठी नावं झाली पक्की

जगातील सर्वात लोकप्रिय टी- २० लीग म्हणजेच इंडियन प्रीमीअर लीग आपल्या १५ व्या हंगामाकडे कूच करत आहे. सध्या ८ संघांच्या फँचायझींना आपल्या संघातील खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवार पासून संपणार आहे. जुन्या ८ संघाच्या फ्रँचायझींनी खेळाडूंना रिटेन करण्याच्या कार्यपद्धतीला अंतिम स्वरूप दिल्यानंतर २ नवीन फ्रँचायझी लखनऊ आणि अहमदाबादच्या संघाच्या फ्रँचायझींना २५ डिसेंबर दरम्यान ३ खेळाडू निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यांनतर जानेवारी मध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. जुने ८ संघ जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करू शकतात. त्यामध्ये ३ पेक्षा जास्त भारतीय किंवा २ पेक्षा जास्त विदेशी खेळाडूंचा समावेश असू शकत नाही.माहितीनुसार, जुन्या ८ संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जवळपास निश्चित केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला संघासोबत कायम ठेवले आहे. त्यासोबतच पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्कियाला दिल्लीच्या फ्रँचायझीने रिटेन केले आहे. तर श्रेयस अय्यरचा संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीनेआपला कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवले आहे. मात्र, संघासमोर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यापैकी एकाला रिटेन करण्याचे आव्हान असेल. तर विदेशी खेळाडू कायरन पोलार्डला देखील रिटेन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नई सुपर किंग्जमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले आहे तर गतवर्षी जेतेपदाची चौकार पार करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ऋतुराज गायकवाडला देखील रिटेन केले आहे. सोबतच विदेशी खेळाडू मोईन अलीला सीएसकेने रिटेन केले आहे.

दरम्यान पंजाब किंग्ज कडून अद्याप कोणत्याच खेळाडूला रिटेन करण्यात आले नाही. मात्र माहितीनुसार कर्णधार के.एल राहुल आणि मयंक अग्रवाल सोबतच मोहम्मद शमीला पंजाबचा संघ रिटेन करू शकतो.

केकेआर फ्रँचायझीने वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नरेन यांना संघासोबत कायम ठेवले आहे.

राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सॅमसनला कर्णधार बनवूनही संघाली चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. दरम्यान रिटेन करण्याच्या यादीत इंग्लंडच्या जोस बटलरचा देखील समावेश होऊ शकतो.

तर सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला कायम ठेवले आहे. त्याचबरोबर राशिद खानच्या नावावरही संघ विचार करत आहे. दरम्यान हैदराबादचा संघ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजनला रिटेन करणार का याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

रॉयल चॅलेजर्स बंगळुरूकडून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला रिटेन करण्यात आले आहे. दरम्यान आरसीबी आणखी दोन भारतीय आणि एक विदेशी खेळाडू कोणते रिटेन करणार याबाबत अद्याप संभ्रम आहे.


हे ही वाचा:http://IND vs NZ Test : अजिंक्य रहाणेच्या या चुकीमुळे भारताने सामना गमावला; शेन वॉर्नने व्यक्त केली नाराजी


 

First Published on: November 30, 2021 2:54 PM
Exit mobile version