IPL 2022 : पंजाब किंग्जला आणखी एक झटका; के.एल राहुलनंतर हा दिग्गज सोडणार संघाची साथ

IPL 2022 : पंजाब किंग्जला आणखी एक झटका; के.एल राहुलनंतर हा दिग्गज सोडणार संघाची साथ

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र पंजाब किंग्जच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार के.एल राहुल यापू्र्वीच संघापासून वेगळा झाला आहे. दरम्यान आता सहकारी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी देखील राजीनामा दिला आहे. आयपीएल २०२२ च्या पूर्वसंध्येलाच पंजाबच्या संघाला एकामागून एक झटका बसला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार झिम्बाब्वेचे माजी खेळाडू अँडी फ्लावर यांनी पंजाब किंग्जच्या सहकारी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. आयपीएल २०२२ च्या सुरूवातीला ते कोणत्या अन्य संघासोबत जाण्याची शक्यता आहे.

झिम्बाब्वेचे मोठे खेळाडू आणि संघाचे कर्णधार राहिलेले अँडी फ्लावर यांनी मागील काही कालावधी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद देखील सांभाळले होते. २०२० मध्ये त्यांचे आयपीएलच्या स्पर्धेत आगमन झाले आणि पंजाब किंग्जच्या संघासोबत जोडले गेले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अँडी फ्लावर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा संघाकडे सोपवला आहे आणि तो स्विकार पण केला आहे.

अँडी फ्लावर लखनऊ किंवा अहमदाबादच्या संघासोबत जोडले जातील अशी चर्चा रंगली आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंजाब किंग्जचा कर्णधार के.एल राहुलदेखील पण संघापासून वेगळा झाला आहे. तर राहुल पण लखनऊच्या संघासोबत जोडला जाण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्जच्या संघाने मयंक अग्रवाल आणि अर्शदीप सिंग या दोन खेळाडूंना रिटेन केले आहे. मयंकला १२ कोटी तर अर्शदीपला ८ कोटींनी संघासोबत कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जच्या संघाला कर्णधार के.एल राहुलला कायम ठेवायचे होते मात्र तो स्वत:च संघातून बाहेर पडला. जे नियमांच्या विरूध्द आहे.


हे ही वाचा: http://ICC Test Ranking : कसोटी क्रमवारीच्या टॉप ५ मध्ये शाहीन आफ्रिदीची झेप; बुमराहची झाली घसरण


 

First Published on: December 1, 2021 8:12 PM
Exit mobile version