MI VS DC : अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव

MI VS DC : अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 43 व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 10 धावांनी पराभव केला. चार विकेट्सवर 257 धावा केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला नऊ गड्यांच्या मोबदल्यात 247 धावांवर रोखले. (IPL 2024 MI VS DC Mumbai Indians lost 10 runs to Delhi Capitals match)

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली. जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या 27 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या 84 धावांची जबरदस्त खेळी केली. याशिवाय सलामीवीर पोरेलने 36 धावा केल्या. तिसऱ्या विकेटसाठी शाई होप आणि ऋषभ पंत यांच्यात 53 धावांची भागीदारी झाली. शाय होप 17 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. तर रिषभ पंतने 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. पंत आणि स्टब्समध्ये 55 धावांची भागीदारी झाली. स्टब्स 25 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला. तर अक्षर पटेलने 11 धावांची योगदान दिले. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात वुड, बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 विकेट गमावून 247 धावा करता आल्या. टिळक वर्माने मुंबईसाठी 63 धावांची दमदार खेळी केली. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये रोहित शर्मा (8), इशान किशन (20) आणि सूर्यकुमार यादव (26) यांच्या रुपात तीन विकेट गमावल्या. यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याने 46 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्याशिवाय टीम डेव्हिडने 37 धावा, नेहलने 4, मोहम्मद नबीने 7, पियुष चावलाने 10  आणि ल्यूक वुडने नाबाद 9 नऊ धावा केल्या. दिल्लीकडून रसिक सलाम आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, तर खलील अहमदने दोन विकेट घेतल्या.

दिल्लीला प्ले ऑफची संधी?

मुंबई इंडियन्सचाचा परभव करत दिल्ली कॅपिटल्सने प्ले ऑफमध्ये आपली पकड अधिकत मजबूत केली आहे. दिल्लीने आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत 5व्या स्थान पोहचली आहे. तर, मुंबई इंडियन्स प्लेऑफ मध्ये 9 व्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत. यामुळे मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 27, 2024 8:25 PM
Exit mobile version