IPL 2024 : मुंबई इंडियन्स दोन गटात विभागली; ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कचं वादग्रस्त वक्तव्य

IPL 2024 : मुंबई इंडियन्स दोन गटात विभागली; ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सचे 9 सामने झाले असून, त्यातील केवळ 3 सामन्यात विजय मिळवला. 6 सामन्यातील पराभवामुळे मुंबईचा संघ आयपीएल 2024च्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. यंदा मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित शर्माकडे न देता हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त करत हार्दिक पांड्याला ट्रोल केले. शिवाय, मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याचीही चर्चा आयपीएलच्या सुरुवातीपासून क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सुरू होती. अशात, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानेही मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याचे म्हटले आहे. (ipl 2024 mumbai indians team divided into two groups michael clarke claim)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने एक स्पोर्टच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईच्या कामगिरीवर स्पष्टपणे भाष्य केले. मायकल क्लार्कच्या मते, “मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी व्यक्तीगत प्रतिभापेक्षा संघ एकजूट होऊन खेळणे महत्वाचे असते. संपूर्ण संघ कसा कामगिरी करतो, त्यावर यश अवलंबून असते. सध्या मुंबई इंडियन्सचा संघात उभी फूट पडली आहे. त्यामुळे खेळाडूंना एकजूट होऊन खेळता येत नाही, त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र होईल की नाही, माहीत नाही. आपण जे पाहतोय त्यापेक्षा मुंबईच्या ताफ्यात बरेच काही चालले आहे. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू संघात असतानाही कामगिरीत सातत्य दिसत नाही. मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे गट पडले आहेत. कोणताही प्लॅन काम करत नाही. एकजूट होत नाहीत. संघाला एकसंघ होऊन खेळता येत नाही”, असे मायकल क्लार्क म्हणाला.

याशिवाय, “व्यक्तिगत प्रतिभा विजय मिळवून देऊ शकते. रोहित शर्माने आणखी एक शतक ठोकले. हार्दिक पांड्याने धावा काढल्या. बुरमहाने सर्वाधिक गडी बाद केले तर, उर्वरित सामन्यात काहीही होऊ शकतं. मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी एकसंघ म्हणून खेळण्याची गरज आहे. फक्त व्यक्तीगत प्रदर्शनापेक्षा एकजूट होऊन खेळणे महत्वाचे आहे. पुढील सामन्यात मुंबईच्या ताफ्यात बदल होईल, अशी अपेक्षा आहे”, असेही मायकल क्लार्क म्हणाला.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. आयपीएल सर्वाधिक यशस्वी कर्णधार अशी कामगिरी असणाऱ्या रोहित शर्माकडून यंदा कर्णधार पद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या संघातील काही खेळाडू निराश आहेत. परंतू, मुंबईची सद्यस्थितीत पाहता मुंबई इंडियन्सला क्वालिफाय करण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणे बंधनकारक आहे.

दरम्यान, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टिम डेविड आणि जसप्रीत बुमराह यासारखे मॅच विनर खेळाडू असतानाही मुंबईच्या संघाला विजय मिळवता आला नाही. मुंबई इंडियन्सला नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवता आले आहेत. सहा गुणांसह मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – T-20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंडचा संघ जाहीर

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 30, 2024 6:03 PM
Exit mobile version