भारताविरुद्ध सराव सामना खेळणे फायदेशीर

भारताविरुद्ध सराव सामना खेळणे फायदेशीर

रॉस टेलरचे मत

आगामी क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानल्या जाणार्‍या भारताशी सराव सामना खेळण्याचा आम्हाला या स्पर्धेच्या तयारीसाठी फायदा होईल, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने व्यक्त केले. न्यूझीलंड आणि भारत या संघांमध्ये २५ मे रोजी सराव सामना होणार आहे, तर न्यूझीलंडचा विश्वचषकातील पहिला सामना १ जून रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारताविरुद्ध २५ तारखेला होणारा सराव सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त असणार आहे. भारताचा संघ खूपच मजबूत आहे आणि त्यामुळे त्यांना हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानेल जात आहे. त्यामुळे अशा संघाविरुद्ध सामना खेळणे आमच्यासाठी चांगले असणार आहे, असे टेलर म्हणाला.

या विश्वचषकात फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या असतील असा अंदाज आहे. मात्र, असे असले तरी या विश्वचषकात मोठ्या धावसंख्या पाहायला मिळणारच हे निश्चित नाही, असे टेलरला वाटते. याबाबत तो म्हणाला, २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीही इंग्लंडमधील खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल असतील अशी चर्चा होती. मात्र, त्या स्पर्धेत फार मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या नाहीत. फलंदाजांनी परिस्थितीनुसार खेळले पाहिजे. कधी गोलंदाजांचे पारडे जड असेल, तर कधी फलंदाजांचे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहिले पाहिजे.

First Published on: May 22, 2019 4:29 AM
Exit mobile version