धोनी कर्णधारपदी!

धोनी कर्णधारपदी!

भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने शनिवारी आपला सर्वोत्तम एकदिवसीय संघ निवडला. या संघाच्या कर्णधारपदी त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची निवड केली. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले होते. त्यामुळे जाफरने त्याची आपल्या सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदी निवड केली.

जाफरने आपल्या सर्वोत्तम एकदिवसीय संघात धोनीसह चार भारतीय खेळाडूंना स्थान दिले. त्याने सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या भारतीयांची निवड केली. मधल्या फळीत त्याने वेस्ट इंडिजचे व्हीव रिचर्ड्स, भारताचा विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा बेन स्टोक्स यांना स्थान दिले. जाफरने पाकिस्तानचा वसिम अक्रम, वेस्ट इंडिजचा जोएल गार्नर आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा या तीन वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात निवडले. फिरकीपटू म्हणून पाकिस्तानचा साक्लेन मुश्ताक आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न या महान गोलंदाजांपैकी एकाची निवड करणे त्याला अवघड गेले.

जाफरचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, व्हीव रिचर्ड्स, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), वसिम अक्रम, जोएल गार्नर, ग्लेन मॅकग्रा, साक्लेन मुश्ताक/ शेन वॉर्न. [१२ वा खेळाडू – रिकी पॉन्टिंग]

First Published on: April 5, 2020 2:39 AM
Exit mobile version