कल्पेश कोळी चषक क्रिकेट

कल्पेश कोळी चषक क्रिकेट

आकाश सिंगच्या दमदार शतकाच्या जोरावर ठाणे ब विभागाच्या संघाने एल.आय.सी. कल्पेश गोविंद कोळी स्मृती आंतर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या १६ वर्षाखालील तिसर्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात ठाणे ब विभागाच्या आकाश सिंगने घाटकोपर ब विभागाविरुद्ध नाबाद १०२ धावांची खेळी केली. या धावा त्याने १०४ चेंडूत १६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या. मात्र, त्याच्या संघाचा या सामन्यात पराभव झाला. घाटकोपर विभाग बने पहिल्या डावाच्या आघाडीवर हा सामना जिंकला. पण, हा सामना गमावला असला तरीही त्यांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. आता मंगळवार आणि बुधवारी ठाणे विभाग ब विरुद्ध घाटकोपर विभाग अ आणि कालिना विभाग अ विरुद्ध कालिना विभाग ब असे उपांत्य फेरीचे सामने माटुंग्याच्या मेजर दडकर मैदानावर होतील.

संक्षिप्त धावफलक
’क’ गट –
ठाणे विभाग ब : (पहिला डाव) १४४ आणि (दुसरा डाव) ३ बाद २२४ (आकाश सिंग नाबाद १०२, अथर्व विचारे ४२, ध्रुव कोळी ३७) पहिल्या डावातील पिछाडीमुळे पराभूत वि. घाटकोपर विभाग ब : (पहिला डाव) १७५ (स्वयम वाघमारे ६८, पृथ्वी नायर ४४, आर्यन दलाल ७/५१).

’अ’ गट –
घाटकोपर विभाग अ : (पहिला डाव) ९ बाद १२४ डाव घोषित आणि (दुसरा डाव) सर्वबाद २०२ (अमन खान ५५, आदित्य देवगावकर ३०; अनुराग सिंग ३/५५, कुणाल नवरंगे ४/४०) पहिल्या डावातील आघाडीमुळे विजयी वि. ठाणे विभाग अ : (पहिला डाव) ९ बाद १०७ डाव घोषित (अमन खान १२ धावांत ५ बळी) आणि (दुसरा डाव) ५ बाद १३५ (आदित्य रावत ६२).

First Published on: May 21, 2019 4:42 AM
Exit mobile version