Virat Vs Sourav Controversy: एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित करा, कपिल देव यांचा सल्ला

Virat Vs Sourav Controversy: एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित करा, कपिल देव यांचा सल्ला

भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी बासीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहीलाला एक सल्ला दिला आहे. दोघांनाही एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेवर लक्ष केंद्रित केलं पाहीजे. एका वृत्तवाहिनीला कपिल देव यांनी मुलाखत दिली होती. त्यामध्ये कपिल देव म्हणाले की, मिडिया किंवा लोकांमध्ये जास्त सहभाग घेण्यासाठी सर्वात आधी एकमेकांना टार्गेट करू नका. तुमच्या समोर दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करायचा पाहीजे. बीसीसीआय अध्यक्ष एका जागी आहेत. तर दुसऱ्या जागी भारताचं कर्णधारपद आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भारतीय संघामध्ये जर खटके उडत असतील तर मिडियासमोर किंवा पब्लिकसमोर या गोष्टी बोलण्यापेक्षा तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं पाहीजे. एकमेकांना दोषी ठरवत बसू नका. तर तुम्ही आपल्या देशाचा विचार करा. असं कपिल देव म्हणाले. जे काही चुकीचं आहे किंवा घडलंय ते उद्या समोरच येणार आहे. परंतु तुम्ही मिडियाच्या समोर येऊन जर या सर्व गोष्टी उघड करत असाल तर हे काही बरोबर नाहीये. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवणार आहे. या सर्व बातम्या खोट्या असून फक्त हवेत पसरवल्या जात होत्या.

सौरव गांगुली यांच्या वक्तव्यावर विराटचा पलटवार

रनमशीन विराट कोहलीला टी-२०चं कर्णधारपद न सोडल्याचा सल्ला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत एकच कर्णधार असावा असं वक्तव्य गांगुली यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर विराट कोहलीने सांगितलं की, बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने माझ्या कर्णधारपदाबाबात प्रश्न उपस्थित केलेला नाहीये. तसेच मला एकदिवसीय मालिकेच्या कर्णधारबपदावरून काढून टाकण्याची माहिती दिली होती. असं कोहली म्हणाला.


हेही वाचा : Virat Kohli Press Conference : कर्णधारपदाच्या वादावरून कोहली-गांगुलींमध्ये मतभेद; गांगुलींच्या दाव्यावर विराट म्हणाला…


 

First Published on: December 16, 2021 1:40 PM
Exit mobile version