किकी बेर्टेन्सला अजिंक्यपद

किकी बेर्टेन्सला अजिंक्यपद

Kiki Bertens

हॉलंडची बॅडमिंटनपटू किकी बेर्टेन्सने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असणार्‍या सिमोन हालेपचा पराभव करत माद्रिद ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने अंतिम फेरीतील सामना ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये जिंकला. तिने या स्पर्धेचे सर्व सामने सरळ सेटमध्ये जिंकण्याचा विक्रमही केला. किकीने मागील वर्षीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तिला पेट्रा क्विटोव्हाने पराभूत केले होते. ही स्पर्धा जिंकल्यामुळे आता ती जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. इतक्या वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली हॉलंडची महिला खेळाडू आहे.

अंतिम सामन्याची सुरुवात किकीसाठी चांगली झाली नाही, तर हालेपने आक्रमक सुरुवात करत पहिल्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, यानंतर सलग चार गेम जिंकत किकीने पहिला सेटही जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये मात्र किकीने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. तिने पहिल्याच गेममध्ये हालेपची सर्व्हिस मोडत आणि दुसर्‍या गेममध्ये आपली सर्व्हिस राखत २-० अशी आघाडी मिळवली. यानंतर २-२ अशी बरोबरी असताना तिने पुन्हा हालेपची सर्व्हिस मोडत आणि आपली सर्व्हिस राखत ४-२ अशी आघाडी मिळवली. तिने पुढेही आपला चांगला खेळ सुरू ठेवत हा सेट ६-४ असा जिंकत हा सामनाही जिंकला. हे बेर्टेन्स नववे डब्लूटीए जेतेपद होते, तर या पराभवामुळे हालेपची जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी जाण्याची संधी हुकली. मागील वर्षी फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या हालेपला त्यानंतर चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यानंतरच्या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तिला चौथी फेरीही पार करता आलेली नाही.

मी खूप हुशारीने खेळले

माद्रिद ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर किकी बेर्टेन्स म्हणाली, या सामन्याच्या सुरुवातीला मला लय सापडत नव्हती. मात्र, त्यानंतर मी खूप हुशारीने खेळले. मला नशिबाचीही थोडी साथ मिळाली, परंतु मी या सामन्याच्या अखेरीस ज्याप्रकारे खेळले, त्याचा मला आनंद आहे. मी या संपूर्ण स्पर्धेतच चांगली खेळले. आता सोमवारी मी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचणार आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूपच खास आहे.

First Published on: May 13, 2019 4:18 AM
Exit mobile version