IPL:2019 पंजाबची विजयी सलामी

IPL:2019 पंजाबची विजयी सलामी

ipl 12 पंजाबची विजयी सलामी

आपल्या धडाकेबाज फलंदाजी साठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने अपेक्षे प्रमाणे कामगिरी करत, यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात ७९ धावाकरत पंजाबला चांगली सुरवात करुन दिली. तर दुसरीकडे पंजाबच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत पंजाबच्या मानसिंह मैदानावर झालेल्या हंगामातील पहिल्या सामन्यात राजस्थानवर १४ धावांनी विजय मिळवला. राजस्थान विरुद्ध याच मैदानावर याआधी खेळलेल्या मागील सहा सामन्यांमध्ये पंजाबचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ४ गड्यांच्या बदल्यात राजस्थान समोर १८४ धावांचे आव्हान उभे केले.

राजस्थानची चांगली सुरवात

पंजाबने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाटलाग करताना राजस्थानची सुरवात दमदार झाली. सलामीला आलेल्या अजिंक्य राहणे आणि जोस बटलर यांनी पहिल्या गड्यासाठी ८.१ षटकात ७८ धावांची भागीदारी केली. मात्र पंजाबचा कर्णधार असलेल्या अश्विनने सामन्यातील दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडुवर राहणेला त्रिफळाचीत केले. त्यानंतर आपल अर्धशतक पूर्ण करुन मैदानावर सेट झालेल्या बटलारला अश्विनने चलाखीने धावचीत केले. त्यानंतर शेवटच्या शतकात पंजाबने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे राजस्थानला २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या बदल्यात १७० धावा करता आल्या. पंजाबच्या मुजीबने एकाच षटकात दोन गडी बाद करत पंजाबच्या विजयात महत्वाची वाटा उचलला.

शेवटची षटके निर्णायक

शेवटच्या पाच षटकांमध्ये राजस्थानला जिंकण्यासाठी ५० धावांची अवश्यकता होती. मात्र १६ व्या षटकात स्मिथ आणि संजू सैमसन आउट झाल्याने सामना पंजाबच्या बाजूने झुकला. तिसऱ्या गड्यासाठी या दोघांनी ४० धावांची भागीदारी केली. पंजाबच्या मुजीबने एकाच षटकात दोन गडी बाद करत पंजाबच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांसमोर शेवटच्या षटकांमध्ये राजस्थानच्या फलंदाजांना मैदानात टिकाव धरता आला नाही.

 

First Published on: March 26, 2019 9:42 AM
Exit mobile version