KKR vs RCB : 6, 4, 4, 6, 4, 4 कोलकाताच्या Phil Salt ची तुफानी खेळी; एका षटकांत केल्या 28 धावा

KKR vs RCB : 6, 4, 4, 6, 4, 4 कोलकाताच्या Phil Salt ची तुफानी खेळी; एका षटकांत केल्या 28 धावा

KKR vs RCB कोलकाता : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 223 धावांचे लक्ष्य बंगळुरूसमोर ठेवले आहे. कोलकाताकडून फलंदाजी करताना फिल सॉल्टने एका षटकात लॉकी फर्ग्युसनला तब्बल 28 धावा ठोकल्या. (KKR vs RCB IPL 2024 Phil Salt hits 28 runs with 4 fours 2 sixes in single over of Lockie Ferguson)

फिल सॉल्ट याने लॉकी फर्ग्युसन एकाच षटकात 6, 4, 4, 6, 4, 4 मारत 28 धावा केल्या. विशेष म्हणजे लॉकी फर्ग्युसन हा पॉवर-प्लेमधील चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी फिल सॉल्टने त्याच्या गोलंदाजीवर तुफानी खेळी केली. कोलकाता विरूद्धच्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाला चांगली खेळी करता आली नाही. बंगळुरुच्या पहिल्या 3 षटकांपर्यंत कोलकाताची धावसंख्या कमी होती. पण चौथ्या षटकात मात्र फिल सॉल्टने 28 धावा ठोकल्या.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई फायद्यात, चेन्नईला धक्का

पहिल्या तीन षटकात बंगळुरूच्या चे गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत केवळ 27 धावा दिल्या. यावेळी मोहम्मद सिराज याने दोन तर यश दयालने एक षटक टाकले होते. चौथ्या षटकात बदल म्हणून लौकी फर्ग्युसन गोलंदाजीसाठी आला त्याच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्ट ने बाउन्सर वर षटकार मारला त्यानंतर दोन सलग चौकार गेले चौथ्या चेंडूवर पुन्हा एक तुंग असा षटकार खेचण्यात आला त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन चौकार मारून सॉल्ट ने तब्बल 28 धावांची कमाई केली.

मात्र, फिल सॉल्टला आपली फलंदाजी जास्त काळ टिकवता आली नाही. पाचव्या षटकात पुन्हा मोहम्मद सिराज फलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्या चेंडूवर नारायणला एकेरी धाव घेण्यास भाग पाडले तर दुसऱ्या चेंडूवर सॉल्टला झेलबाद केले. रजत पाटीदारने फिल सॉल्टचा झेल घेतला. सॉल्टने 342 च्या स्ट्राइक रेटने 14 चेंडू 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या.


हेही वाचा – RCB vs KKR : कोलकाताच्या रिंकू सिंगवर विराट कोहली नाराज; म्हणाला, आता काय करू…, व्हिडीओ व्हायरल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 21, 2024 7:36 PM
Exit mobile version