आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीच किंग

आयसीसीच्या क्रमवारीत कोहलीच किंग

यंदाच्या वर्षातील आयसीसीच्या शेवटच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.मात्र कसोटीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड हे दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. त्यात विराट कोहलीने ९२८ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. पण चेतेश्वर पुजाराची एका स्थानाने घसरण होऊन तो ७९१ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने त्याची जागा घेतली आहे. तो ८०५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. याशिवाय आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने दमदार कामगिरीच्या जोरावर टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. तो ८ स्थानांची झेप घेत ७१२ गुणांसह १० व्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तरित्या सातव्या स्थानी आहे. या दोघांचे ७५९ गुण आहेत. टीम इंडियाने २०१९ या वर्षाचा शेवट गोड केला. वेस्ट इंडिज विरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिकेत भारताने विजय मिळवला. तर त्या आधी खेळलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत भारताने बांगलादेशला २-०ने धूळ चारली.

First Published on: December 31, 2019 1:54 AM
Exit mobile version