सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक बनवा, इरफान पठाणचा सल्ला

सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक बनवा, इरफान पठाणचा सल्ला

नवी दिल्ली : IPL 2023 च्या 16 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capital) आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या हंगामात दिल्लीने लाजीरवाणी कामगिरी केल्यामुळे भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) लाखमोलाचा सल्ला दिला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक बनवा असा सल्ला त्याने दिला आहे.

इरफान पठाणने स्टार स्पोर्ट वाहिनीवर बोलताना म्हटले की, सौरव गांगुलीला दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक बनवल्यास दिल्ली संघात मोठा बदल होईल. गांगुली भारतीय खेळाडूंची मानसिकता चांगल्या पद्धनीने ओळखतो. ड्रेसिंग रुममधील वातावरणही त्याच्यामुळे चांगले होईल. भारतीय संघाचा कर्णधार असताना गांगुलीने अनेक खेळाडूंना घडवले आहे. त्यामुळे तो दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक झाल्यास तो दिल्लीसाठी चांगली कामगिरी करु शकतो.

सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या संचालकपदी नियुक्ती 
मार्च 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने सौरव गांगुलीला संचालक म्हणून नियुक्त केले आहे. संचालक म्हणून गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाच्या वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांची कामगिरी पाहणार आहे. यामध्ये वुमन्स प्रीमियर लीगशिवाय दक्षिण अफ्रीका टी-20 लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्स आणि आयएल टी-20 मधील दुबई कॅपिटल्स या संघाचा समावेश आहे.

दिल्लीची 16 व्या हंगामात निराशाजनक कामगिरी
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली आहे. दिल्लीने सुरुवातीचे पाच सामने गमावल्यामुळे ऋषभ पंत उणीव त्यांना जाणवत होती. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दिल्ली संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार डेविड वॉर्नरचा सुरुवातीला धावा करताना स्ट्राईक रेट खूपच कमी होता. त्यामुळे दिल्लीचे 16 व्या हंगामातून बाहेर पडली आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात त्यांना फक्त चार विजय मिळवता आले आहेत.

दिल्लीच्या पराभवाची कारणे?
कर्णधार डेविड वॉर्नर वगळता दिल्लीच्या एकाही फलंजाला मोठी धावसंख्या उभरता आलेली नाही. मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, यश धुल, मनीष पांडे यांच्यासारखे मोठे फलंदाज अपयशी ठरले आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजांचा योग्य वापर करता आलेली नाही. गेल्यावर्षी कुलदीप यादवने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या, पण या वर्षी त्याचा योग्य वापर वॉर्नरला करता आलेला नाही. अष्टपैलू अक्षर पटेल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण त्याला फलंदाजी बढती मिळाली नाही. जर बढती मिळाली असती तो संघासाठी आणखी धावा करू शकला असता. याशिवाय दिल्लीच्या प्रमुख गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज एनरिख नॉर्खियासुद्धा फॉर्ममध्ये दिसला नाही.

First Published on: May 17, 2023 9:51 PM
Exit mobile version