मँचेस्टर युनायटेडने केली जोसे मॉरिनीयोची हकालपट्टी

मँचेस्टर युनायटेडने केली जोसे मॉरिनीयोची हकालपट्टी

जोसे मॉरिनीयो

या मोसमाच्या खराब सुरुवातीनंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील आघाडीचा संघ मँचेस्टर युनायटेडने प्रशिक्षक जोसे मॉरिनीयो यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. मँचेस्टर युनायटेड प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात सध्या सहाव्या स्थानी आहेत. तर त्यांना मागील ८ पैकी अवघे २ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे मँचेस्टर युनायटेडने प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  मॉरिनीयो हे मे २०१६ पासून युनायटेडचे प्रशिक्षक होते. ते प्रशिक्षक असताना मँचेस्टर युनायटेडने २०१६-१७ मध्ये इएफएल कप, २०१६-१७ मध्येच युएफा युरोपा लीग या स्पर्धा जिंकल्या होत्या. मात्र, यावर्षी मँचेस्टर युनायटेडचे प्रदर्शन खूपच खराब झाले आहे. त्यामुळेच त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.


त्यांच्याजागी हा मोसम संपेपर्यंत ओले गनर सोलशार यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. सोलशार हे यापूर्वी मँचेस्टर युनायटेड संघाकडून १९९६-२००७ या कालावधीत खेळले होते.

First Published on: December 19, 2018 11:21 PM
Exit mobile version