मानधना, जेमिमाला बढती

मानधना, जेमिमाला बढती

जेमिमाला,मानधना

भारतीय महिला संघाच्या फलंदाज स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांना आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत बढती मिळाली आहे. मानधनाने सहाव्या स्थानी तर जेमिमाने दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे.

मानधना आणि जेमिमा या दोघींनीही नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. मानधनाने या मालिकेच्या ३ सामन्यांमध्ये २ अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक १८० धावा केल्या होत्या. तिने या सामन्याच्या अखेरच्या सामन्यात ८६ धावांची खेळी केली होती.

त्यामुळे तिला चार स्थानांची बढती मिळाली आहे. ती ६९३ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचली आहे. तर मुंबईकर जेमिमाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एका अर्धशतकासह १३२ धावा केल्या होत्या. त्यामुळे ती ७३७ गुणांसह दुसर्‍या स्थानी पोहोचली आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडची सुझी बेट्स पहिल्या स्थानी आहे. तिच्या खात्यात ७६५ गुण जमा आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या क्रमवारीत ६८७ गुणांसह सातव्या स्थानी आहे.

गोलंदाजांमध्ये भारताच्या राधा यादव १८ स्थानांची बढती मिळाली असून ती थेट १० व्या स्थानी पोहोचली आहे. तिच्या खात्यात ६५९ गुण आहेत. तर दीप्ती शर्मा १४ व्या स्थानी आली आहे.

First Published on: February 13, 2019 4:55 AM
Exit mobile version