IND vs NZ 2nd Test : १४ बळी घेणारा एजाज पटेल नाही बनला सामनावीर; सोशल मीडियावर चिघळला नवा वाद

IND vs NZ 2nd Test : १४ बळी घेणारा एजाज पटेल नाही बनला सामनावीर; सोशल मीडियावर चिघळला नवा वाद

भारताने मुंबईत झालेल्या न्यूझीलंडसोबतच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. भारताने ३७२ धावांच्या मोठ्या विजयाने नवा इतिहास रचला आहे. कसोटी सामन्यात धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने दुसऱ्या सामन्यातील विजयासोबतच मालिकेवर देखील कब्जा केला. मात्र भारताने सामन्यात मोठा विजय मिळवला असला तरी देखील हा सामना न्यूझीलंडच्या एजाज पटेलच्या चमकदार कामगिरीमुळे अधिक चर्चेत राहिला. मुंबईतच जन्मलेल्या एजाजने भारताविरूध्द पहिल्या डावात १० बळी पटकावले आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. एजाजने सामन्यात एकूण १४ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दहा बळी पटकावणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, एजाजच्या एवढ्या मोठ्या ऐतिहासिक खेळीच्या नंतरदेखील त्याला सामनावीर घोषित करण्यात आले नाही. तर सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या भारताच्या मयंक अग्रवालला सामनावीर म्हणून घोषित केले. आता या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. तो यासाठी की एजाजने जी खेळी केली ती इतिहासात खूप कमी पहायला मिळते. कोणत्याही एका डावात संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करण्याचा खूप मोठा विक्रम आहे. कारण १८७७ पासून सुरू झालेल्या कसोटी क्रिकेटमध्ये असे फक्त ३ वेळा झाले आहे.

मयंक अग्रवालची दोन्ही डावात शानदार खेळी

एजाजच्या चमकदार फिरकीनंतरदेखील मयंक अग्रवालने पहिल्या डावात १५० धावा, दुसऱ्या डावात ६२ धावा केल्या बदल्यात त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मात्र या निर्णयावरून आता सोशल मीडियावर वाद चिघळला आहे. काही लोकांनी सोशल माीडियावर या मुद्द्याला अनुसरून टिप्पणी केली आहे आणि सोबतच काही माजी क्रिकेटपटूंनी देखील विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर कित्येक लोकांनी एजाज पटेलला सामनावीर घोषित करायला हवे होते असे म्हंटले.

काही लोकांनी लिहिले की एजाज पटेल हा सामन्यातील खरा खेळाडू आहे कारण त्याने असे काही केले आहे जे यापूर्वी फक्त दोनदा घडले होते. सोशल मीडियावरील युजर्ससह रवीचंद्रन अश्विनने देखील सामन्याच्या नंतर संवाद साधताना एजाज पटेलचे कौतुक केले आणि त्याने जे केले आहे ते ऐतिहासिक असल्याचे म्हंटले.

एका डावात १० बळी घेणारे खेळाडू

जिम लेकर – १० बळी विरूध्द ऑस्ट्रेलिया, १९५६
अनिल कुंबळे- १० बळी विरूध्द पाकिस्तान, १९९९
एजाज पटेल- १० बळी विरूध्द भारत, २०२१


हे ही वाचा: http://R Ashwin : अश्विनने घरच्या मैदानावर ३०० बळी केले पूर्ण; कुंबळेच्या या विक्रमाची केली बरोबरी


 

First Published on: December 6, 2021 2:41 PM
Exit mobile version