बार्सिलोनाच्या विजयात मेस्सीची चमक

बार्सिलोनाच्या विजयात मेस्सीची चमक

युएफा चॅम्पिअन्स लीगच्या साखळी फेरीत बार्सिलोनाने टॉटनहॅम हॉटस्परचा ४-२ असा पराभव केला. या सामन्यात बार्सिलोनाचा सुपरस्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने २ गोल करत बार्सिलोनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर फिलिप कुटिनीहो आणि इवान रॅकटीच यांनी १-१ गोल केला.

असा झाला सामना

या सामन्यात बार्सिलोनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. फिलिप कुटिनीहोने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २८ व्या मिनिटाला इवान रॅकटीचने अप्रतिम गोल करत बार्सिलोनाची आघाडी २-० अशी केली. मध्यंतरानंतर हॅरी केनने गोल करत टॉटनहॅम हॉटस्परचा पहिला गोल केला. पण ५६ व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत बार्सिलोनाची आघाडी ३-१ अशी केली. यानंतर एरीक लामेलाने गोल करत या सामन्याचा स्कोर ३-२ असा केला. पण ९० व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत बार्सिलोनाला ४-२ ने विजय मिळवून दिला.
First Published on: October 4, 2018 11:24 PM
Exit mobile version