माइक टायसन येणार भारतात

माइक टायसन येणार भारतात

कुमिते १ लीग स्पर्धेचे आयोजक मोहम्मदअली बुधवानी

 कुमिते १ लीग या स्पर्धेमध्ये भारतासह चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका, पाकिस्तान, बहारिन, संयुक्त अरब अमिरात या देशांचे खेळाडू सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना २९ सप्टेंबरला वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांत होणार आहे. 
 
या स्पर्धेत एकूण ८ संघ आहेत. प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील. त्यात ८ पुरुष आणि १ महिला खेळाडूचा समावेश असेल. या स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यात ५ मिनिटांच्या ३ फेऱ्या होतील. कुमिते १ लीग या स्पर्धेची संकल्पना मोहम्मदअली बुधवानी यांची आहे. या स्पर्धेमागे मार्शल आर्ट्सचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. 
 
जगभरातील मार्शल आर्ट्सचे सर्वोत्तम प्रकार एकत्र आणणे आणि त्यांना जागतिक स्तरावर लोकप्रिय करणेहे कुमिते १ लीगचे उद्दिष्ट आहे. एमएमएचे असंख्य चाहते आम्हाला निर्माण करायचे आहेत आणि तरुणांना शिस्तएकाग्रताकणखरपणासहनशीलता व इच्छाशक्ती अंगिकारण्याचा संदेश द्यायचा आहे.
– मोहम्मदअली बुधवानी
   
 
First Published on: September 5, 2018 6:45 PM
Exit mobile version