Missing Chinese Player case : चीनी पत्रकाराने पेंग शुईचा नवीन व्हिडिओ केला शेअर; खेळाशी संबंधित कार्यक्रमात नोंदवला सहभाग

Missing Chinese Player case : चीनी पत्रकाराने पेंग शुईचा नवीन व्हिडिओ केला शेअर; खेळाशी संबंधित कार्यक्रमात नोंदवला सहभाग

चीनची स्टार टेनिसपटू खेळाडू पेंग शुईचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ चीनच्या स्थानिक पत्रकाराने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुई चीनच्या बास्केटबॉल खेळाडू याओ मिंगसोबत बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत अद्याप संभ्रम आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, हा व्हिडिओ त्याच्या एका मित्राने शेअर केला होता. पेंग शुई शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान तिचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.

शुई मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत राहिली होती. कारण पेंग शुईने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर ती अचानक गायब झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला टेनिस महासंघासह अनेक खेळाडूंनी तिच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र हे प्रकरण वाढत असताना पेंग शुईने ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशीही चर्चा केली होती.

दरम्यान, शुईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ७ सेकंदाच्या या व्हिडिओत ती खुष असल्याचे दिसते आहे. ती चार खेळाडूंसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये पेंग आणि याओशिवाय ऑलिम्पिक सेलिंग चॅम्पियन झू लिजिया आणि माजी टेबल टेनिसपटू वांग लिकिन देखील दिसत आहेत. हे चार खेळाडू एफआयएस आंतरराष्ट्रीय स्कीइंग चायना टूरच्या बॅनरसमोर उभे आहेत. तर व्हिडिओमध्ये शांघायचा यांगपू ब्रिजही दिसत आहे.


हे ही वाचा:  http://IPL 2022 : मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ-अहमदाबादच्या संघांना ३-३ खेळाडू विकत घेण्याची संधी; या खेळाडूंची नावे आघाडीवर


 

First Published on: December 19, 2021 5:27 PM
Exit mobile version