Shami On Captaincy: कसोटी कर्णधारपदाच्या मुद्द्यावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

Shami On Captaincy: कसोटी कर्णधारपदाच्या मुद्द्यावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा सामना खेळवण्यात आला. परंतु टीम इंडियाने ही मालिका २-१ अशी हातातून गमावली. त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याबद्दल त्याने ट्विट देखील केलं. मात्र, विराट कोहलीनंतर कसोटी कर्णधारपदाची धुरा कोणता खेळाडू सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संघात मला जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी नीट पार पाडेन, अशा प्रकारचं वक्तव्य करत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी संघाच्या कर्णधार पदासाठी तयारी दाखवली आहे.

जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला की, कसोटी कर्णधार पदाबाबत सध्याच्या वेळी मी अजिबात विचार करत नाहीये. परंतु संघात मला जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडेन. मी माझ्या कामावर लक्ष देत आहे. खरं म्हणजे टीम इंडियाचं कर्णधार सांभाळण्यासाठी कोणाला आवडणार नाही?, असा प्रश्न विचारत सगळ्याचं ते स्वप्न असल्याचं त्याने मुलाखतीत म्हटलंय.

मी सर्व फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध

६ फेब्रुवारी पासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. मालिकेसाठी मोहम्मद शमीला काही वेळेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून मोहम्मद शमी सतत सामन्यांमध्ये खेळत असल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. मी सर्व फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे. तसे झाल्यास मी खूप उत्सुक आहे, असं देखील शमी म्हणाला.

वनडे मालिकेत शमीला दिली विश्रांती

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या तीन वनडे मालिकेंसाठी तो खेळला नव्हता. टीम इंडियाला ०-३ चा सामना करावा लागला. वनडे मालिकेत शमीला विश्रांती देण्यात आली होती. कसोटी मालिकेत शमीने १४ गडी बाद केले आहेत. तर सेन्च्युरियनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी त्यांचं सर्वात मोठं योगदान राहीलं. मात्र, जोहानिसबर्गनंतर केपटाऊनमधील कसोटी मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला. परंतु कसोटी मालिकेचं कर्णधारपद कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : मालेगावात काँग्रेसला खिंडार,२८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश


 

First Published on: January 28, 2022 9:00 AM
Exit mobile version