‘या’ कारणामुळे मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कारापासून वंचित…

‘या’ कारणामुळे मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कारापासून वंचित…

भारत सरकारने केंद्रीय पुरस्कारासांठी क्रीडा संघटनांकडून खेळाडूंच्या नामांकनाचे अर्ज मागवले आहेत. मात्र बीसीसीआय यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्या नामांकनाचा अर्ज अर्जुन पुरस्कारासाठी पाठवू शकते, असे सांगण्यात येत आहे. पण सलग दोन वर्षे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या पुरस्काराच्या लायक असतानाही बीसीसीआय त्याच्या नामांकनाचा अर्ज केंद्र सरकारला पाठवू शकत नाही. यासाठी कारण ठरत आहे त्याची पत्नी हसीन जहा.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शमीसह अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचाही अर्ज बीसीसीआय केंद्र सरकारला अर्जुन पुरस्कारासाठी पाठवणार होती. मात्र एकीकडे बुमराहला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वर्षे पूर्ण न झाल्यामुळे त्याचा अर्ज अर्जुन पुरस्कारासाठी रद्द करण्यात आला. तर दुसरीकडे पत्नीमुळे शमीचा अर्जही बीसीसीआयने केंद्र सरकारला पाठवला नाही.

‘या’ कारणामुळे शमी पुरस्कारापासून वंचित…

ज्या खेळाडूवर आरोप असतील आणि केस सुरु असेल त्याला अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरवता येऊ शकत नाही. त्यामुळे लायक असूनही बीसीसीआयने शमीचा अर्ज केंद्र सरकारला अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलेला नाही.

शमीची पत्नी हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि हुंडा मिळवण्यासाठी पत्नीला मारहाण, असे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शमीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचबरोबर न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे फक्त पत्नीच्या तक्रारीमुळे शमी हा अर्जुन पुरस्कारापासून वंचित राहीला आहे, असे समजते आहे.


बोलण्यातून देखील पसरू शकतो ‘कोरोना’; जाणून घ्या, नेमकं कसं करावं संरक्षण
First Published on: May 14, 2020 10:21 PM
Exit mobile version