IPL 2022: रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात षट्कारांची स्पर्धा, कोण आहे आघाडीवर?

IPL 2022: रोहित शर्मा, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात षट्कारांची स्पर्धा, कोण आहे आघाडीवर?

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाला सुरूवात झाली आहे. यामध्ये मास्टरस्ट्रोक आणि युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षट्कार ठोकले आहेत. गेलने आतापर्यंत ३५७ षट्कार ठोकले आहेत. तर दुसरा क्रमांक एबी डिव्हिलियर्सचा आहे. एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये एकूण २३९ षट्कार ठोकले आहेत. परंतु सध्याच्या हंगामात रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यात षट्कारांची स्पर्धा सुरू आहे. रोहितने आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत, पण या शर्यतीत धोनी आणि विराटही मागे नाहीये.

यंदाच्या हंगामात आघाडीवर कोण ?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एकूण २३१ षट्कार ठोकले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनीने २२२ षट्कार ठोकले आहेत. रोहित आणि धोनीमध्ये ९ षटकारांचे अंतर आहे, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २१२ षटकार ठोकले आहेत. याचा अर्थ विराट आणि धोनीमध्ये १० षटकारांचे अंतर आहे. या मोसमात आतापर्यंत हे तिन्ही फलंदाज पूर्ण रंगात दिसून आलेले नाहीयेत.

यंदाच्या हंगामात भारतासाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षट्कार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे हे पहावे लागणार आहे. या तीन फ्रँचायझींच्या संघांबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत ९ व्या आणि १० व्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी पहिले चार सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सने पाच वेळा, तर चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चार सामन्यांतून तीन विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.


हेही वाचा : Jallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतात कोणते बदल झाले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळाली नवी दिशा


 

First Published on: April 13, 2022 12:48 PM
Exit mobile version