Mumbai Indians : मुंबईचा केवळ पहिला विजयच नाही तर, रचला IPLच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड

Mumbai Indians : मुंबईचा केवळ पहिला विजयच नाही तर, रचला IPLच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील पहिला विजय मुंबई इडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मिळवला. प्रथम फलंदाजी करत 235 धावांचे आव्हान दिल्लीसमोर ठेवले होते. परंतू, 29 धावांनी मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. विशेष म्हणजे या विजयासह मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डसह मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात सर्व संघाना मागे टाकले आहे. (Mumbai Indians First Win In Ipl all History created in wankhede stadium)

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा पराभव करत मुंबईने विजयाचे खाते उघडले. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर 50 वा विजय मिळवला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही संघाला घरच्या मैदानात ५० विजय मिळवता आलेले नाहीत. पण रविवारी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला.

हेही वाचा – Mumbai Indians : सर्वाधिक षटकारांसह धावांमध्ये हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय खेळाडू

मुंबई इंडियन्सनंतर घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा क्रमांक येतो. केकेआरच्या नावावर इडन गार्डन्समध्ये 48 विजय आहेत.

मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघावर 29 धावांनी मात केली. यात रोमारिओ शेफर्डने अॅनरिक नॉर्कियाने टाकलेल्या डावाच्या अखेरच्या षटकात चोपलेल्या 32 धावा निर्णायक ठरल्या. कारण मुंबईने दिलेल्या 235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीनेही 8 बाद 205 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर अखेरचे 12 चेंडू शिल्लक असताना मुंबईच्या 5 बाद 183 धावा झाल्या होत्या. या सामन्यात अखेरच्या षटकात शेफर्डने नॉर्कियाविरुद्ध 4, 6, 6, 6, 4, 6 अशा एकूण 32 धावा केल्या. त्यामुळे मुंबई आव्हानात्मक धावसंख्या रचू शकला.


हेही वाचा – Mumbai Indians : अखेर जिंकलेच! तीन सामन्यांच्या पराभवानंतर घरच्या मैदानावर मुंबईचा पहिला विजय

First Published on: April 8, 2024 10:19 PM
Exit mobile version