गुजरातमध्ये 36 व्या नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात; देशभरातून 7000 स्पर्धकांचा समावेश

गुजरातमध्ये 36 व्या नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात; देशभरातून 7000 स्पर्धकांचा समावेश

नॅशनल गेम्स 2022 स्पर्धा म्हणजेच राष्ट्रीय खेळ स्पर्धा 2022ला सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये नॅशनल गेम्स 2022 स्पर्धेला सुरूवात झाली आहे. नॅशनल गेम्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाले. या उद्धाटनानंतर आजपासून स्पर्धेला सुरूवात होत आहे. (National Games 2022 India Gujarat)

यंदा 36 वी नॅशनल गेम्स 2022 स्पर्धा गुजरातच्या भूमीत पार पडत आहेत. जवळपास 7 वर्षानंतर ही स्पर्धा होत असून, यामध्ये देशभरातून जवळपास 7000 स्पर्धक सहभागी होत आहेत. तसेच, 36 प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू मैदानात उतरताना दिसणार आहेत.

दरम्यान, 36 वे नॅशनल गेम्स 2016 मध्ये गोवा येथे पार पडणार होते. मात्र, त्यावेळी काही कारणांमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर देशभरात आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही आणखी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, सध्या देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटला असल्याने पुन्हा एकदा ही स्पर्धा होत आहे.

नॅशनल गेम्स 2022 वेळापत्रक –

20 ते 24 सप्टेंबर: टेबल टेनिस
26 सप्टेंबर ते ऑक्टोबर: कबड्डी
26 ते 30 सप्टेंबर: नेटबॉल
28 ते 30 सप्टेंबर: रग्बी
29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: नेमबाजी (रायफल आणि पिस्तूल)
30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर: शूटिंग (शॉटगन)
30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: कुस्ती
30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर: ट्रायथलॉन
30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर: तिरंदाजी
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर : खो-खो
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: लॉन बाउल
29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर: टेनिस
30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटबोर्डिंग
30 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर: रोलर स्पोर्ट्स स्केटिंग
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: कुंपण घालणे
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: जिम्नॅस्टिक्स
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: वेटलिफ्टिंग
30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर: ऍथलेटिक्स
30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर: रोइंग
1 ते 10 ऑक्टोबर: फुटबॉल (महिला)
1 ते 4 ऑक्टोबर: सायकलिंग (ट्रॅक)
1 ते 5 ऑक्टोबर: स्क्वॉश
1 ते 6 ऑक्टोबर: बॅडमिंटन
ऑक्टोबर 1 ते 3: बास्केटबॉल 3×3
ऑक्टोबर 1 ते 6: बास्केटबॉल 5×5
ऑक्टोबर 2 ते 11: फुटबॉल (पुरुष)
2 ते 8 ऑक्टोबर: अॅक्वेटिक्स
2 ते 9 ऑक्टोबर: हॉकी
5 ते 12 ऑक्टोबर: बॉक्सिंग
6 ते 11 ऑक्टोबर : योगासन
6 ते 9 ऑक्टोबर: गोल्फ
7 ते 11 ऑक्टोबर : मल्लखांब
7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्ट टेनिस
7 ते 11 ऑक्टोबर: ज्युडो
8 आणि 9 ऑक्टोबर: सायकलिंग (रस्ता)
8 ते 11 ऑक्टोबर : वुशु
10 आणि 11 ऑक्टोबर: कॅनोइंग
7 ते 11 ऑक्टोबर: सॉफ्टबॉल
6 ते 9 ऑक्टोबर: बीच व्हॉलीबॉल
8 ते 12 ऑक्टोबर: व्हॉलीबॉल


हेही वाचा – टी-20 विश्वचषकाचे अंतिम विजेते होणार मालामाल; स्पर्धेत एकूण 45.66 कोटींचे बक्षीस

First Published on: September 30, 2022 5:12 PM
Exit mobile version