न्यूझीलंडने सहज श्रीलंकेचा केला पराभव

न्यूझीलंडने सहज श्रीलंकेचा केला पराभव

न्यूझीलंडने सहज श्रीलंकेचा केला पराभव

न्यूझीलंडने आपले १० गडी राखत श्रीलंकेला धूळ चारली आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडची विजयी सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय न्यूझीलंडने सार्थ ठरवला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेला १३६ धावांवर रोखलं. याशिवाय न्यूझलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यांपुढे श्रीलंकेचे फलंदाज फार काळ टिकले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना१३६ धावांवर रोखण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले. त्यामुळे श्रीलंकेने दिलेले १३७ धावांचे माफक आव्हान न्यूझीलंडच्या सलामी जोडीने सहज पूर्ण केले.

सलामी जोडी फोडण्यातही श्रीलंका अपयशी

श्रीलंकेने दिलेल्या १३७ धावांचे आव्हान न्यूझीलंडची सलामी जोडीने सहज पूर्ण केले. मार्टीन गप्टीलने नाबाद ५१ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. तर मुनरोने ४७व चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. विशेष म्हणजे श्रीलंकेने २९.२ षटकांत १३६ धावा केल्या होत्या. मात्र, न्यूझलंडच्या सलामी जोडीने फक्त १६.१ षटकांत डाव आवरता घेत विजयाचा झेंडा फडकवला.

श्रीलंकेचे वाईट प्रदर्शन

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात फार खराब झाली. पहिल्याच षटकात लहिरु थिरीमिनेला अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर दिमुथ करुणरत्नेने कौसल परेरा सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, परेरा २९ धावा करुन बाद झाला. परेरा नंतर श्रीलंकेचे एकामागेएक सर्व गडी तंबूत परतत गेले. परंतु, कर्णधार दिमुथ करुणरत्ने आपल्या परिने प्रयत्न करत होता. अखेर थिसारा परेरासोबत पुन्हा डाव सावरण्याचा प्रयत्न दिमुथने केला. थिसाराने चांगली साथ देत असताना तो झेलबाद झाला. त्यामुळे तो २७ धावांवर बाद झाला. यानंतर श्रीलंकेचे सर्व गडी एका मागे एक करुन बाद झाले. दिमुथ एकहाती लढत राहिल्यामुळे त्याचे अर्धशतक झाले आणि श्रीलंकेचा संघ१३६ धावांपर्यंत पोहोचला.

First Published on: June 1, 2019 9:04 PM
Exit mobile version