एशियाडचे दिमाखात उद्घाटन

एशियाडचे दिमाखात उद्घाटन

क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या एशियाड क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर पार पडला. इंडोनेशियाच्या संस्कृतीचा दर्शन देखावा यावेळी उभारण्यात आला होता. ४००० पेक्षा जास्त इंडोशियाच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक रोषणाईने स्थळ सजवण्यात आले होते.

इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी बाईकवरून स्टेडियमवर मारलेली एन्ट्री आकर्षणाची मध्यबिंदू ठरली. 1962 साली पहिल्यांदा जकार्ताने आशियाई स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर तब्बल 56 वर्षांनी हा मान जकार्ताला मिळाला आहे. त्यामुळे विडोडो यांनी उद्धाटन सोहळ्यात 1962च्या आठवणींना उजाळा दिला. 120 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद तसेच 26 मीटर उंचीचे भव्य स्टेज या उद्घाटन सोहळ्यासाठी तयार करण्यात आले होते. हे स्टेज विविध प्रकारांच्या झाडांनी आणि फुलांनी सजविले होते. स्टेजच्या मागील बाजूस इंडोनेशियातील भौगोलिक सुंदरता दाखविण्यात आली होती.

उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंच्या ५७२ खेळाडुंच्या पथकाचे नेतृत्त्व युवा अ‍ॅथलेट नीरज चोप्राने केले. 100 पेक्षा जास्त वाद्यवृंदाच्या तालावर विविध कलाकारांनी आपले नृत्य सादरीकरण करण्यात आले होते. 45 मिनिटे हा उद्घाटन सोहळा रंगला. स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध देशांच्या पथकांनीदेखील संचलन केले. यंदा या स्पर्धेत ई-स्पोर्ट्स कॅनोई पोलो या खेळाचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर पॅराग्लायडिंग हा खेळ यंदा या स्पर्धेत पहिल्यांदाच आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उन आणि दक्षिण कोरियाचे मून जी-इन हे एकेकाळचे कट्टर वैरी सोहळ्याला एकमेकांना मिठी मारताना दिसले. खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण यांची सीमा नसते याची प्रचिती यावेळी आली. दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन शेजार्‍यांमधील वाद सर्वांना ज्ञात आहे. परंतु, आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने हेवेदावे विसरत हे दोन देश एकत्र आले.

First Published on: August 18, 2018 11:04 PM
Exit mobile version