झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची BCCI ला विनंती, धोनीसाठी अखेरचा सामना भरवा!

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची BCCI ला विनंती, धोनीसाठी अखेरचा सामना भरवा!

महेंद्रसिंग धोनी

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. तो इथून पुढे फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, भारताच्या ब्लू जर्सीमध्ये धोनीला पाहण्याचा योग आता पुन्हा येणार नाहीये. महेंद्र सिंह धोनीने काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आजपर्यंत भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना निवृत्तीसाठी एक योग्य प्रकारचा सेंडऑफ देण्यात आला होता. त्यासाठी त्यांच्या चाहत्यांना आणि टीममधील इतर खेळाडूंना पुरेसा कालावधीही मिळाला होता. महान खेळाडू सचिन तेंडुलकरला देखील शेवटची मॅच खेळताना पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली होती. मात्र, महेंद्रसिंह धोनीने त्याच्या चाहत्यांना ती संधी देखील दिलेली नाही.

पुन्हा सामान भरवा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धोनीचं आतापर्यंतच्या खेळासाठी कौतुक केलं आहे. धोनी हा संपू्ण देश आणि झारखंडचा गौरव आहे. माझ्या मते धोनीला एक अखेरचा सामना खेळायला मिळायला हवा. मी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित केला जावा, अशी मागणी सोरेन यांनी केली आहे. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

धोनी सध्या आगामी आयपीएलची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएल खेळल्या जाणार आहे. यासाठी आता धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर

२०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. गेल काही महिने तो पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत रांची येथील फार्महाऊसमध्ये राहत आहे.


हे ही वाचा – MS Dhoni : निवृत्तीच्या पोस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीनं लिहिला फक्त दोन ओळींचा संदेश!


 

First Published on: August 16, 2020 9:01 AM
Exit mobile version