लॉर्डसवर पाकिस्तान विजयी

लॉर्डसवर पाकिस्तान विजयी

विकेट मिळवल्यानंतर आनंद व्यक्त करताना पाकिस्तानचा संघ

पहिल्या कसोटीत इंग्लडला नऊ विकेट्सने हरविले

लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट खेळ दाखवत इंग्लंडवर तब्बल नऊ विकेट राखून विजय मिळविला. विशेष म्हणजे पाकिस्तानने हा विजय इंग्लंडच्या घरच्या मैदानावर मिळवला आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानने जबरदस्त बॉलिंग करत अवघ्या २७ मिनीटांत इंग्लंडचे शेवटचे चार गडी बाद केले. यानंतर पाकिस्तानला पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी केवळ ६४ रनांचे लक्ष्य होते. जे अवघ्या तासाभरात गाठत पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळवली.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आज आम्ही बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा सर्वच विभागात खराब प्रदर्शन केले. ज्यामुळे आम्हाला ही हार पत्करावी लागली. तसेच पाकिस्तानच्या बॉलर्सने उत्तम प्रदर्शन केले”

कसोटीचा लेखा-जोखा

इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत संपुष्टात आला. यानंतर खेळताना पाकिस्तानने ३६३ रनांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या डावात इंग्लंडची ६ बाद ११० अशी अवस्था होती त्यामुळे पाकिस्तानला दुसरा डाव खेळावा लागतो कि नाही अशी एकवेळ परिस्तिथी होती. मात्र त्यानंतर जॉस बटलर आणि डॉम बेस यांनी १२५ रनांची भागीदारी केली ज्यामुळे पाकिस्तानसमोर ६४ रनांचे लक्ष्य उभे राहीले. आणि इंग्लडचा अपमानजनक पराभव टळला. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोहम्मद अब्बास याने बटलरला एलबीडब्ल्यूने आऊट करत या भागिदारीला पूर्णविराम लावला. शेवटच्या डावात शनिवारी अवघ्या २३५ रनांवर इंग्लंडचे ६ गडी बाद झाले होते. त्यानंतर एका मागोमाग एक इंग्लंडचे गडी बाद होत गेले इंग्लंडचे शेवटचे ४ फलंदाज संघासाठी केवळ ६ रन करून तंबूत परतले. यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानच्या अझहर अलीला चार रनांवर जेम्स अँडरसनने बोल्ड केले. मात्र त्यानंतर इम्रान उल-हक (नाबाद १८) आणि हरीस सोहेल (नाबाद ३९ यांनी नाबाद ५४ रनांची भागीदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

First Published on: May 28, 2018 10:03 AM
Exit mobile version