आधी पैसे द्या…नंतरच सुरक्षा

आधी पैसे द्या…नंतरच सुरक्षा

बीसीसीआय.जगातील क्रिकेट संघटनांपैकी श्रीमंत संघटना.परंतु,याच बीसीसीआयने चंदीगड पोलिसांचे 9 कोटी रूपये थकवल्याने त्याचा फटका भारतीय संघाच्या सुरक्षेला बसला आहे.सध्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा टी-20 सामना मोहाली येथे बुधवारी (18)होणार आहे.

परंतु,यावेळी चंदीगड विमानतळावर उतरलेल्या भारतीय संघास सुरक्षा पुरवण्यास चंदीगढ पोलीस प्रशासनाने स्पष्ट नकार दिला.तसेच बीसीसीआयने याआधीचे 9 कोटी रूपयांचे बील थकवल्याचे कारणही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील धरमशाला येथे 15 सप्टेंबरला नियोजित असलेला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.त्यामुळे 16 तारीखला भारतीय संघ चंदीगढ विमानतळावर पोहोचला. परंतु,यावेळी चंदीगढ पोलिसांनी सुरक्षा पुरवण्यास नकार दिला.त्यामुळे अखेर मोहाली पोलिसांना भारतीय क्रिकेट संघाला सुरक्षा पुरवावी लागली.तसेच हॉटेलमध्ये सुद्धा भारतीय संघाच्या सुरक्षेसासाठी खासगी रक्षक पुरवण्यात आले आहेत.

First Published on: September 18, 2019 5:35 AM
Exit mobile version