प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचा मुंबईत लिलाव

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचा मुंबईत लिलाव

क्रिकेटप्रेमी जशी आयपीएलची वाट बघत असतं. त्याचप्रमाणे कबड्डी प्रेमी प्रो कबड्डीची आतुरतेने वाड बघत असतात. लवकरच प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला सुरूवात होईल. प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचा लिलाव आज आणि उद्या मुंबईत पार पडणार आहे.

बोलीवर मर्यादा येणार

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. याऐवजी उदयोन्मुख खेळाडूंवरच फ्रेंचायझींचे विशेष लक्ष असेल असही म्हटलं जातय. या आधीच्या सहाव्या हंगामात दीड कोटी रूपयांची विक्रमी बोली लावण्यात आली होती. एकूण सहा खेळाडूंना एक कोटीच्या वर बोली लावण्यात आली होती. मात्र कमी बोली असणाऱ्या खेळाडूंची कामगिरी विषेश उल्लेखनीय ठरली होती.

रिशांक देवाडिगा आणि फझल अत्राचाली या दोनच खेळाडूंचे संघ गेल्यावर्षी बाद फेरीपर्यंत पोहचले. मात्र मोनू गोयत, राहुल चौधरी, नितीन तोमर आणि दीपक हुडा हे खेळाडू संघाची कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरले होते.

सातव्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावात अ, ब, क आणि नवे खेळाडू अशा चार श्रेणींत एकूण १९ राज्यांचे ४४२ खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यापैकी १३ देशांच्या ५३ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. लिलावात राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई, रण सिंग, संदीप नरवाल, जयदीप, महेंदर सिंग, परवेश भन्सवाल, रविंदर पहेल, सुरजित सिंग, चंद्रन रणजित, प्रशांत कुमार राय आणि श्रीकांत जाधव यांच्यावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील १३ खेळाडूंवर प्रामुख्याने सगळ्यांच लक्ष असणार आहे. यापैकी अ-श्रेणीत गिरीश ईर्नाक, रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव आणि सिद्धार्थ देसाई या चौघांचा समावेश आहे.

अनुप कुमार

अनुपकडे पुणेरी पलटणची जबाबदारी

मागील हंगामात कबड्डीतून निवृत्ती घेतलेल्या अनुप कुमारकडे यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. अनुपच्या पाठोपाठ आता राकेश कुमारनेसुद्धा प्रशिक्षकाचा मार्ग स्विकारला आहे. राकेशकडे हरयाणा स्टीलर्सने प्रशिक्षकपद सोपवले आहे.

First Published on: April 8, 2019 1:47 PM
Exit mobile version