शारदाश्रममध्ये कबड्डी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

शारदाश्रममध्ये कबड्डी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

शारदाश्रममध्ये कबड्डी दिनानिमित्त कार्यक्रम

महाराष्ट्र कबड्डी दिन आणि गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून ‘गुरू शिष्याच्या’ मुलाखतीचा कार्यक्रम शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी प्रशिक्षक सुहास जोशी, तसेच यू-मुंबाचा कबड्डीपटू अजिंक्य कापरे उपस्थित होते. शारदाश्रम तांत्रिक विद्यालय गेली तीन वर्ष ओम कबड्डी प्रबोधिनीच्या माध्यमातून मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवत आहे.

स्वतः मेहनत घेतल्याशिवाय फळ मिळत नाही. शेट्टी सरांच्या प्रेरणेने मी आज कबड्डी खेळाडू म्हणून येथे उभा आहे. ओम कबड्डी प्रबोधिनीचा मला घडवण्यात मोलाचा वाटा आहे. एल्फिंस्टन येथे होणार्‍या प्रशिक्षण शिबिरात सलग तीन वर्षे भाग घेतल्यामुळे मला फिटनेसचे महत्त्व कळले, असे शिष्य म्हणून उपस्थित असलेला अजिंक्य कापरे म्हणाला. तसेच गुरू सुहास जोशी म्हणाले, कबड्डी हा पाय खेचण्याचा खेळ असला तरी हातात हात घेऊन खेळायचा खेळदेखील आहे. खेळाडूने प्रथम चांगला माणूस असायला हवे. तुम्ही चांगले माणूस असाल तर खेळानंतरही लोक तुमचा आदर करतील.

शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाच्या विद्यमाने आणि ओम कबड्डी प्रबोधिनीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात माया मेहेर, जीवन पैलकर, वैशाली सावंत, दीपक राणे, राजू कवळे, शशिकांत राऊत यांनी मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मंगेश कोचरेकर यांनी केले.

First Published on: July 19, 2019 4:58 AM
Exit mobile version