PV Sindhu : पीव्ही सिंधूने पटकावलं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद, मालविका ठरली उपविजेती

PV Sindhu : पीव्ही सिंधूने पटकावलं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय विजेतेपद, मालविका ठरली उपविजेती

दोन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरलेल्या पीव्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत मालविका बनसोडचा २१-१३ आणि २१-१६ ने पराभव केला आहे. त्यामुळे मालविका बनसोड उपविजेती ठरली असून पीव्ही सिंधुच्या उत्तम कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

BWF क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित रशियन प्रतिस्पर्धी इव्हगेनिया कोसेत्स्कायाला दुखापत झाल्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, मालविकाने तीन सामनाच्या उपांत्य फेरीत आणखी एका भारतीय अनुपमा उपाध्यायचा १९-२१, २१-१९, २१-७ असा पराभव केला.

इशान भटनागर- तनिषा कॅस्ट्रोने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी २१-१६, २१-१२ अशी टी.एच. नागेंद्र बाबू – एस. गुराझादा या जाेडीचा पराभव केला.

१३ जानेवारी रोजी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायना नेहवालचा पराभव केला होता. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता सायना नेहवालला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मालविकाने हरवलं होतं. ३४ मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या सामन्यात मालविकाने २१-१७,२१-९ ने सायनाला पराभूत केलं होतं. परंतु आज पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत मालविका बनसोडचा २१-१३ आणि २१-१६ ने पराभव केला आहे.


हेही वाचा : जनतेला भरकटवणं हेच विरोधकांचं काम, मुख्यमंत्री लवकरच दिसणार अॅक्शन मोडमध्ये – आदित्य ठाकरे


 

First Published on: January 23, 2022 7:32 PM
Exit mobile version