सुशांत चौगुले ठरला ‘आरएमभट श्री’ चा मानकरी

सुशांत चौगुले ठरला ‘आरएमभट श्री’ चा मानकरी

 

मुंबईः टाँप टू बाँटम पिळदार आणि दमदार असलेल्या सुशांत चौगुले याने यंदाच्या ‘आरएमभट श्री’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले. फुल टू तयारीत असलेल्या सुशांत पुढे अभिषेक मानकर कमी पडल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर संतोष साळगावकर हा ‘मेन फिजिक्स’चा अंतिम विजेता ठरला.

सालाबादप्रमाणे यंदाही ‘आरएमभट श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. शोएब खान, सुशांत चौगुले आणि अभिषेक मानकर या गटविजेत्यांमध्ये  किताब विजेते पदासाठी काट्याची टक्कर झाली. तुल्यबळ असलेले तिघेही एकमेकांना तगडी झुंज देत होते. पण अखेर फुल फाँर्ममध्ये असणाऱ्या सुशांतने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर दोघांवर मात करून मानाचे विजेतेपद पटकावले.

तर यंदाचा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून अभिषेकच्या नावाची चर्चा होती. परंतू त्याला अखेर उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.शोएब तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विवेक गायकवाड याला ‘बेस्ट इमप्रुव्हमेंट’ शरीरसौष्टवपटू म्हणून गौरविण्यात आले. तर ‘वन मिनिट फ्रि पोजिंग’वर नितीन तोरसकर याने जबरदस्त पोजिंगचा नजराणा पेश केला. त्यामुळे नितीन बेस्ट पोजरचा मानकरी ठरला. तसेच यावेळी पार पडलेल्या ‘मेन्स फिजिक्स’ प्रकारात संतोष साळगावकर हा सर्वात भारी ठरला. संतोषने उर्वरित खेळाडूंचे तगडे आव्हान लिलया परतवून लावत विजयश्री आपल्या नावावर केली. विविध वजनी गटात खेळवल्या गेलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अगदी चुरशीची ही स्पर्धा झाली.

शेकडो चाहत्यांची उपस्थिती

आर. एम. भट व्यायामशाळेचे प्रमुख शरद (भाई) आंबोले, काशिनाथ जाधव, विष्णु घाग, राष्ट्रीय खेळाडू विक्रांत देसाई, संदिप बनसोडे यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. तर राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू रोहन धुरी, जालिंदर आपके, प्रविण गणविर यांनी पचांची भुमिका बजावली. प्रशांत खामकर यांनी सुत्रसंचलन केले. विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, बँग, टि शर्ट व पदक देऊन गौरविण्यात आले.

First Published on: February 12, 2023 3:15 PM
Exit mobile version