पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या भारतीय क्रिकेटपटूने मास्कवरून घातली पोलिसांसोबत हुज्जत

पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या भारतीय क्रिकेटपटूने मास्कवरून घातली पोलिसांसोबत हुज्जत

पत्नीसोबत घराबाहेर पडलेल्या भारतीय क्रिकेटपटूने मास्कवरून घातली पोलिसांसोबत हुज्जत

देश अनलॉक प्रक्रियेत आहे मात्र देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हळुहळु काही गोष्टी उघडण्यात येत आहेत. मात्र, अनलॉकमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली असली तरीही सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं असे नियम घालून देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा या नियमांचा भंग केल्याप्रकरणी चर्चेत आला आहे.

रविंद्र जडेजा सोमवारी रात्री ९ वाजल्याच्या सुमारास त्याची पत्नी रिवाबासोबत कारमधून घराबाहेर पडला होता. राजकोटमधील किसनपारा चौकात पोलिसांनी जडेजाची गाडी अडवत ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार सोनल गोसाई यांनी जडेजाला मास्क न घातल्यामुळे दंड आकारण्यात येईल असं सांगितलं. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. गोसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जडेजाने कारमध्ये असताना मास्क घातलेला नव्हता. यामुळे जडेजाला आपण थांबवल्याचं गोसाई म्हणाल्या. तर जडेजाने सोनल गोसाई यांच्या विरोधात उद्धटपणे वागल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आलेल्या ताणामुळे गोसाई यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी राजकोटचे पोलिस उपायुक्त मनोहरसिंह जडेजा यांनी, रविंद्र जडेजा आणि गोसाई या दोघांचीही बाजू ऐकून घेतल्याचं सांगितलं.

First Published on: August 11, 2020 4:36 PM
Exit mobile version