रायडूच्या गोलंदाजीवर बंदी !

रायडूच्या गोलंदाजीवर बंदी !

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायडू

भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायडूच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेण्यात आला होता. तर, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रायडूवर आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे.

न्यूझीलंड मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात रायडूने फिरकी गोलंदाजी केली होती. त्यावेळी पंचांनी रायडूच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर आक्षेप घेतला होता. त्याबाबतचा अहवाल सामनाधिकार्‍यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या हाती दिला होता. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र, चाचणी न दिल्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांत रायडूच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्याला स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये गोलंदाजी करता येणार असल्याचे आयसीसीने यावेळी म्हटले.

First Published on: January 29, 2019 4:43 AM
Exit mobile version