ICC ची BCCI ला धमकी

ICC ची BCCI ला धमकी

बीसीसीआय निवड समितीसाठी ही चार नाव शॉर्टलिस्ट!

आयसीसीनं आता बीसीसीआयला धमकी दिली आहे. २०१६ साली T-20 वर्ल्डकपच्या दरम्यान कर रूपानं भरलेले १६० कोटी ३१ डिसेंबरपर्यंत भरा. नाहीतर २०२३च्या वर्ल्डकपचे आयोजन होऊ देणार नाही अशी धमकी ICC नं BCCI ला दिली आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला धक्का बसला आहे. त्यानंतर आता बीसीसीआय विचार करत आहे. २०१६साली T-20 वर्ल्डकपचे भारतामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी करांची रक्कम ही १६० कोटी रूपये होती. तेव्हा आयसीसीने विनंती करूनही भारत सरकारने हा कर माफ केला नव्हता. या स्पर्धेचं आयेजन हे BCCI नं केलं होतं. त्यामुळे १६० कोटी रुपयांचा कर भरणं ही ICC ची नाही तर BCCI ची जबाबदारी आहे. अशी भूमिका ICC नं घेतली आहे. त्यामुळे कर रूपातील १६० कोटी रूपयांची रक्कम परत करा अशी भूमिका ICC नं घेतली आहे. त्यामुळे ही रक्कम परत न केल्यास २०२१ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आणि २०२३ च्या विश्वचषकाचे नियोजित आयोजन भारतात होऊ देणार नाही असं आयसीसीनं बीसीसीआयला सुनावलं आहे.

First Published on: December 22, 2018 10:43 AM
Exit mobile version