CoronaVirus: कोरोनामुळे दिग्गज हॉकीपटूचा मृत्यू!

CoronaVirus: कोरोनामुळे दिग्गज हॉकीपटूचा मृत्यू!

कोरोना व्हायरस

जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाचे सावट आहे. या कोरोनामुळे अनेक क्रिडा क्षेत्राला धक्का बसला आहे. या भयानक कोरोनामुळे १० दिवसात क्रिडा क्षेत्रातील पाच दिग्गजांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी स्वित्झर्लंड आईस हॉकीपटू रॉजर चॅप्पोट यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. १९६४ मधील हिवाळी ऑलिंपिक खेळलेले चॅप्पोट आपल्या देशासाठी १०० हून अधिक सामने खेळले आहेत. यापूर्वी फ्रान्सच्या फुटबॉल क्लबचे रिम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोंजालेज (वय ६०), इंग्लंडचे लान्सशायर कौंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉजकिस (वय ७१), फ्रान्सचे ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दी ऑफ (वय ६८) आणि पाकिस्ताचे आझम खान (वय ९५) या क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांनी जगाला निरोप दिला आहे.

इंटरनॅशनल आईस हॉकी फेजरेशनने सांगितलं की, ‘रॉजर चॅप्पोट यांना दोन आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळेस त्या कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर १ एप्रिला त्यांना घरी घेऊ जाण्यात आलं होत. मात्र त्यांची अचानक प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचे निधन झाले. रॉजर हे स्वित्झर्लंडचे दिग्गज खेळाडू होते त्यांनी ६०चं दशक गाजवलं होतं.’


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सुनील गावस्कर यांची ५९ लाखांची मदत!


 

First Published on: April 9, 2020 12:16 AM
Exit mobile version