स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त; पुढील आठवड्यात खेळणार अखेरची स्पर्धा

स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त; पुढील आठवड्यात खेळणार अखेरची स्पर्धा

स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकताच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयामुळे सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. (Roger Federer announces retirement from tennis after stellar career)

ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररने निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. रॉजर फेडरर पुढील आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कपमध्ये शेवटची टेनिस स्पर्धा खेळणार आहे. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर यादरम्यान लेव्हर कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनंतर टेनिस कोर्टवर रॉजर फेडरर दिसणार नाही.

दरम्यान, फेडररने ट्विट केलेल्या मेसेजला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, त्याचे टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

याशिवाय, 6 ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन टायटल (2009), आठ विम्बल्डन म्हणजेच 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017 तर 5 युएस ओपन म्हणजेच 2004, 2005, 2006, 2007, 2008 यावेळी ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.


हेही वाचा – ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्यापूर्वी प्रेक्षकांना बसणार धक्का…

First Published on: September 15, 2022 7:29 PM
Exit mobile version